Today’s Horoscope 25 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

25.08.2023.

शुभाशुभ विचार- वैधृती वर्ज्य दिवस.

आज विशेष- वरदलक्ष्मी व्रत.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.  आजचे नक्षत्र – अनुराधा 09.14 पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. ही ते शत्रू टपूनच बसलेले आहेत. सतर्क रहा.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

मिथुन ( शुभ रंग- भगवा )

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

सिंह (शुभ रंग- लाल)

जमीन खरेदी विक्रीचे काही रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना मात्र आज अजिबात उसंत मिळणार नाही.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी )

आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदाय होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळलेले बरे.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशा पदरात पडू शकते. महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचार करूनच घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले फार महत्त्वाचे असतील.

धनु- (शुभ रंग- मोतिया )

आज मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी)

आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी )

आज यशस्वी लोकांच्या सहवासात तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. अतिव्यस्त दिवस.

मीन -(शुभ रंग – निळा )

आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल ज्येष्ठ मंडळींना सत्संगाकडे पावले वळवावीच लागतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.