Talegaon Dabhade : तळेगावमध्ये रोटरीच्या माध्यमातून अनुभवण्यात आला चांद्रयान विक्रम लँडरचा सुवर्णक्षण

एमपीसी न्यूज – चांद्रयान विक्रम लँडरचा सुवर्णक्षण (Talegaon Dabhade) अनुभवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने शांताई सिटी सेंटर येथे स्क्रीन लावण्यात आली होती. लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर भारत माता की जय अशा जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. पेढे वाटप करून उपस्थितांनी जल्लोष साजरा केला.

 तळेगाव दाभाडे येथील शांताई सिटी सेंटर वाहनतळ येथे चांद्रयान विक्रम लँडर चंद्रभूमीवर उतरण्याचा सुवर्णक्षण सर्व सामान्य जनतेसोबत स्क्रीन लाऊन साजरा केला. तिरंग्याच्या रंगातील फुग्यांची सजावट,भारत मातेच्या जय घोषात,गणपती बाप्पा मोरया, पेढे वाटप करत 350 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत रोटरी सदस्य व त्यांचे कुटुंब यांनी हा क्षण साजरा केला.
रो प्रसाद मुंगी,रो डॉ नेहा कुलकर्णी व रो हृषिकेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले,सचिव श्रीशैल मेंथे व इतर रोटरी सदस्य यांनी हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला.रो धनंजय मथुरे यांनी या कार्यक्रमातील क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्त (Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.