Chinchwad : मराठा आरक्षणाबाबत शासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ चिंचवड येथे सरकारचा दशक्रिया विधी

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील (Chinchwad)काही दिवसांपासून उपोषण आणि आंदोलने सुरू आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा निषेध करत पिंपरी चिंचवड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासनाचा दशक्रिया विधी करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणी झाल्यानंतर सरकारने(Chinchwad) मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी 30 दिवसांची मुदत घेतली. परंतु 47 दिवस होऊन देखील आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांचे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Maharashtra : मनोज जरांगेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेनी साधला पत्रकारांशी संवाद

अशा घटना घडत असताना देखील शासनाने कोणतीही ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मंगळवारी (दि. 31) चिंचवडगाव येथील मोरया गोसावी दशक्रिया विधी घाटावर सरकारचा प्रतिनिधी दशक्रिया विधी करण्यात आला.

दशक्रिया विधी करत महिलांनी सरकारच्या निषेधार्थ टाहो फोडला. यावेळी उपस्थितांनी सरकारच्या निषेधार्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत घेतली. या कालावधीत मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री यांनी सभा, कार्यक्रम घेतले. मात्र मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही. शासनाने मराठा समाजाची बनवाबनवी केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.