Maharashtra : मनोज जरांगेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेनी साधला पत्रकारांशी संवाद

एमपीसी न्यूज – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सकाळी (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोनवरून संवाद साधला असुन जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर दोघात चर्चा झाली. मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत. नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.

आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे त्यावेळी ते बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, आपण मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले (Maharashtra)आहे. नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे.

Pune : घोरपडी पेठ गोळीबार प्रकरणात तिघांना अटक, केवळ पाच हजारासाठी केला खून

मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत.

 

 

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाललांची भेट घेतली. मराठा आंदोलनावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.