Pune : पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी (Pune)मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषणाला बसले.त्याच दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हिंसाचाराचा घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे.

त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात (Pune)आली असून इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यातील कोंढवा परिसरात दि मुस्लिम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम समाजातील नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.

Pune : घोरपडी पेठ गोळीबार प्रकरणात तिघांना अटक, केवळ पाच हजारासाठी केला खून

एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्कच नाही कोणाच्या बापाच अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी गफूर पठाण म्हणाले की, मागील सहा दिवसापासुन मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे.मात्र त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही.

त्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी आज लाक्षणिक उपोषण करीत आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अन्यथा आम्ही अधिक तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.