Pune : घोरपडी पेठ गोळीबार प्रकरणात तिघांना अटक, केवळ पाच हजारासाठी केला खून

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 च्या पथकाने अवघ्या (Pune)बारा तासात घोरपडी पेठ य़ेथील गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद केले आहे. यावेळी पाच हजार रुपये उसने दिले नाहीत या शुल्लक रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवनाथ लोधा अद्यापही फरार आहे.

रोहीत संपत कोमकर (वय 33 रा.स्वारगेट), गणेश उल्हासराव शिंदे (वय 41 रा.धनकवडी), अमन दिपक परदेशी (वय 29 रा. घेरपडी) अशी अटक आरोपींची नावे असून या गोळीबारात अनिल रामदेव साहू (वय 35 रा. घोरपडी पेठ, पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात संशोधन प्रकल्पांची अविष्कार स्पर्धा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीपेठ येथे (Pune)सोमवारी (दि.30) पहाटे दोघांनी अनिल याच्यावर गोळीबार करत त्याचा खून केला होता. यावरून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याता तपास करत असताना गुन्हे शाखा एक च्या पथकाला बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, 29 ऑक्टोबरच्या रात्री रोहीत कोमकर याचा वाढदिवस साजरा करत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार नवनाथ लोधा व अनिल साहु यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते.

त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नवनाथ लोधा हा सराईत फुटेजमध्ये दिसत होता. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली असता गुन्ह्यातील आरोपी रोहित कोमकर हा स्वारगेट पी.एम.टी डेपो येथे थाबल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रोहीत व त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, नवनाथ याने मयत अनिलकडे दोन दिवसांपुर्वी 5 हजार रुपये मागितेले होते. अनिल याने ते देण्यास नकार दिला.याचा राग मनात धरून अनिल व नवनाथ व इतर आरोपी हे गप्पा मारत बसले असताना नवनाथ याने बांडणास सुरुवात केली. यावेळी अनिल व नवनाथ यांच्यात झटापट झाली. या झटापटीत रागाने आरोपीन पिस्तूल काढून अनिलच्या कपाळावर गोळी झाडली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.

हि कारवाई गुन्हे शाखा एक चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय़्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अमंलदार राहूल मखरे,अजय थोरात, अनिकेत बाबर,आय्याज दड्डीकर,दत्ता सोनवणे व शशिकांत दरेकर यांनी केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.