Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात संशोधन प्रकल्पांची अविष्कार स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित (Talegaon Dabhade)कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये अविष्कार 2023-24 स्थानिक पातळी स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी 25 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड झालेले प्रकल्प विभागीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून (Talegaon Dabhade)आला. बी.फार्मसीच्या विद्यार्थिनी कु. युगंधरा कंग्राळकर व कु. प्रिया जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व 25 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सादर केले. प्रकल्पांचे परीक्षण करण्यासाठी संशोधक डॉ. सुशील राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. राऊत हे बंगलोर येथील इंडिजन संस्थेत संशोधक म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक पातळीवर निवड झालेले प्रकल्प पुढे पुणे विभागीय स्पर्धेसाठी पाठवले जाणार आहेत.

Pune : दिवाळीनिमित्त पुण्यातून सुटणार जादा 512 बसेस

विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना डॉ राऊत, प्राचार्य डॉ संजय आरोटे व डॉ. गणेश म्हस्के म्हणाले कि छोटे संशोधन करत एखादा मोठा अविष्कार घडतो, विद्यार्थ्यांनी असे प्रकल्प करणे गरजेचे आहे आणि संस्था अशा संशोधन प्रकल्पांसाठी नेहमीच पाठिंबा देत आली आहे.

कार्यक्रमाअंती अंतिम वर्षीय विद्यार्थी प्रवीण पालवे याने संस्था, प्राचार्य व सर्व शिक्षकांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता करताना डॉ. मयुरी गुरव व डॉ. योगेश झांबरे यांनी कार्यक्रम यशस्वी व शिस्तबद्धरित्या पार पाडल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उपस्तिथ सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, शैलेशभाई शहा, संस्थेच्या विश्वस्त व उद्योजिका निरुपा कानिटकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.