Chakan :साईबाबा पतसंस्था निवडणुकीत संस्थापकांच्या पॅनेलचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेसाठी चाकण (ता. खेड) येथील(Chakan) श्री शिवाजी विद्यालयात मतदान झाले. तब्बल ८७2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रानिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे केंद्र क्रमांक १ मध्ये ३७०, केंद्र क्रमांक २ मध्ये ३०१, आणि मतदान केंद्र क्रमांक ३ मध्ये ३०१ असे मिळुन ८७२ मतदान झाले.

त्यानंतर सायंकाळी मतमोजणी झाली. भिंतीवरील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संस्थापकांच्या पॅनेलने १० विरुद्ध १ असा दणदणीत विजय संपादन केला. तर विरोधी गटाचा केवळ एक इतर मागास प्रवर्गातील उमेदवार विजयी झाला.

सहा महिन्यापूर्वी दि. २३ एप्रिल २०२३ रोजी याच संस्थेच्या (Chakan)मतमोजणी वेळी बोगस मतपत्रिका येथे आढळून आल्या होत्या. या प्रकरणी तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी धादवड आणि एका पॅनेलचे उमेदवार आणि उमेदवारांचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे ती मतदान प्रक्रिया रद्द करून नव्याने मतदान घेण्यात आले.

मागील पार्श्वभूमी पाहता चाकण पोलिसांनी पाच अधिकारी व मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त ठेवला होता. विजेत्या उमेदवारांचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहकार सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी जाहिर केला.

Pune : दिवाळीनिमित्त पुण्यातून सुटणार जादा 512 बसेस

साईबाबा पतसंस्था निवडणुकीत निवडून आलेले संस्थापकांच्या पॅनेलचे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार पुढील प्रमाणे – युवराज काळडोके ( ५६३ मते ) , देवराम काळे 456 मते, अनिल देशमुख ४४४ मते, पंढरीनाथ लांडे ४१७ मते, अनिल बंडू सोनवणे 400 मते, विश्वनाथ चव्हाण ३८० मते मिळवत विजयी झाले.

महिला प्रवर्गातून ज्योती गरुड 488 मते, व मीराबाई कडूसकर 387 मते मिळवत या दोन महिला विजयी झाल्या. इतर मागासवर्ग प्रवर्गातून मात्र विरोधी पॅनलचे रामदास जाधव 400 मते घेऊन विजयी झाले. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सुनील गोतारणे हे 273 मध्ये घेऊन विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती विशेष मागास प्रवर्गातून देवेंद्र परदेशी 590 मते मिळवत विजयी झाले. विजयानंतर संस्थापकांच्या पॅनेलने एकच जल्लोष केला.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.