Pune : दिवाळीनिमित्त पुण्यातून सुटणार जादा 512 बसेस

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या(Pune) विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एस.टी. महामंडळातर्फे 512 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या गाड्या 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान या कालावधीत सोडण्यात येणार आहेत.

या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवारी), खडकी आणि पिंपरी-चिंचवड आगारातून (Pune)सोडण्याचे नियोजन आहे. या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांना आरक्षण केंद्रावर जाऊन अथवा ऑनलाइन तिकिटाचे आरक्षण करता येईल. स्वारगेट आगारातून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गाड्या सोडल्या जाणार आहेत. याचबरोबर शिवाजीनगर आगारातून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Worldcup 2023 – अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर 7 गड्यांनी विजय; सेमी फायनलच्या आशा पल्लवीत

 

पुण्यात नोकरी आणि शिक्षणानिमित्त बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. दिवाळीच्या सुट्टी निमित्त ते त्यांच्या मूळगावी जातात. प्रवाशांची संख्या जात असल्याने अनेकदा गाड्यांचे तिकीट आरक्षणही मिळत नाही. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याने गावी जाण्यासाठी प्रवाशांची सोय होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.