Worldcup 2023 – अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर 7 गड्यांनी विजय; सेमी फायनलच्या आशा पल्लवीत

एमपीसी न्यूज – अफगाणिस्तानने काल श्रीलंकेला सात गड्यांनी धूळ चारत (Worldcup 2023 )या विश्वचषकातला तिसरा विजय मिळवला. त्यामुळे स्पर्धेत अफगाणिस्तानचे आव्हान अद्यापही कायम असून त्यांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा पल्लवी झाल्याआहेत.

विश्वचषकात प्रत्येक संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले (Worldcup 2023 )आहेत. त्यामुळे उपांत्य फेरी मध्ये कोण प्रवेश करेल याचा अंदाज बांधला जात आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवून अफगाणिस्तानने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे.

Pune : बनावट भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी नाना गायकवाडवर गुन्हा दाखल

काल पुण्यात अफगाणिस्तानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेला सर्वबाद 241 धावांवर रोखण्यात त्यांना यश आले. पथुम निसंका 46, कुसल मेंडीस 39, समरविक्रमा 36 यांनी केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेने दोनशे चा टप्पा ओलांडला. यावेळी फारुकीने 4 गडी बात केले, तर मुजीबने 2 गडी बाद केले.

242 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान समोर होते. सलामीवीर गुरुबाजला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच षटकात मधुशंकाने त्याचा अडथळा दूर केला. त्यानंतर इब्राहिम जादरान 39 आणि रहमत शाह 62 यांनी दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली. मधुशंकाने जादरानला झेलबाद केले. हसमतुल्लाह शाहिदी 58 आणि आजमतुल्लाह ओमरजाई 73 यांनी यांनी शतकी भागीदारी करत अफगाणिस्तानच्या विजयावर शिकामोर्तब केले. श्रीलंकेकडून मधुशंका 2 आणि रजिता 1 असे गडी बाद केले.


विश्वचषकामध्ये मोठ्या संघांना पराभूत केल्याने अफगाणिस्तानचा आत्मविश्वास दुणावला आहे. या विजयासह अफगाणिस्तान गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.त्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान हे अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत. तर इंग्लंडचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.