Hinjawadi Crime News : ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्याला  अटक

एमपीसी न्यूज – महिला वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना (Hinjawadi Crime News) अडवले म्हणून ट्राफिक वॉर्डनला दोघांनी मारहाण केली आहे. याप्रकऱणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आली आहे. हि घटना गुरुवारी (दि.9) हिंजवडी येथील बालाजी पेट्रोलपंप येथे घडली.

याप्रकरणी ट्राफिक वॉर्डन सुनिल शिवाजी बिराजदार (वय 23) यांनी फिर्याद दिली असून वैभव सुदाम दुडे (वय 24 रा. कोथरूड) याला अटक केली असून प्रतीक विजय दुडे (दि.22 रा.कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Alandi News : आळंदीत महिला दिनानिमित्त “नारी शक्तीचा” जागर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस नाईक यांनी कारवाईसाठी आरोपींची गाडी थांबवली. यावेळी आरोपी महिला पोलिसावर ओरडला.यावेळी फिर्यादी म्हणाले की आपल्या घरातपण बाई माणूस असते असे बोलू नये यावेली राग येवून आरोपीने पिर्यादीलाच शिवीगाळ करत हातातील कड्याने मारून जखमी (Hinjawadi Crime News) केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.