Pune News : पीएमपीएल स्पीड ब्रेकरवर आदळल्याने मोडला प्रवासी महिलेचा मणका

एमपीसी न्यूज -भरधाव पीएमपीएल बस स्पीड ब्रेकरवर (गतीरोधक) जोरात ( Pune News )आदळल्याने एका महिला प्रवाशाचे 3 मणके मोडल्याची घटना घडली आहे. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या पुण्यातील वानवडी भागात घडली .

या प्रकरणी अंजुम मुनावर सिद्धकी (44) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पीएमपीएल बस चालक अक्षय दुबे (32 ) याच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम 338 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi Crime News : ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्याला  अटक

सिद्धकी यांच्या फिर्यादीनुसार, अपघाताची घटना 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता वानवडी भागात असलेल्या गिरमे शाळेसमोर घडली. फिर्यादी आणि त्यांची बहीण सायरा (48) या दोघे ही पी एम पी एल बस ने प्रवास करत होत्या. यावेळी बस गिरमे शाळेसमोर आली असता बस चालकाने त्याच्या ताब्यात असलेली बस वेगाने त्या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकर वर आदळली.

वेगात असल्यामुळे याचा हादरा ही जोरात होता. यातच सिद्धकी यांच्या ( Pune News )पाठीला मार बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवले असता त्यांच्या पाठीचे 3 मणके फ्रॅक्चर असल्याचे कळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.