Hinjawadi News : रिता इंडिया फाऊंडेशनतर्फे “महिलांचे आरोग्य आणि जागरूकता” विषयावरील कार्यशाळा संपन्न 

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत रिता (Hinjawadi News ) इंडिया फाऊंडेशन च्या सौजन्याने आयडेंट इंडिया प्रायव्हेट  लिमिटेड, हिंजवडी या कंपनितील 20 महिला  कर्मचारी वर्गासाठी महिलांचे आरोग्य आणि जागरूकता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली .

या कार्यशाळेत आरोग्याचे विश्लेषण आणि पाळी , पाळीतील समस्या उपचार आणि काळजी या विषयावर रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया आणि श्वेता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत भाग घेतलेल्या महिलांनी याला उस्फुर्त प्रतिसाद देत , त्यांच्या समस्या आणि याविषयावरील  मते परखडपणे व्यक्त केली.

हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आयडेंट इंडिया प्रायव्हेट  लिमिटेड चे प्लांट एच आर ऑफिसर अविनाश तुपे , एच आर मॅनेजर सतीश कुलकर्णी आणि असिस्टंट मॅनेजर उदय ओक आणि आयडेंट इंडिया प्रायव्हेट  लिमिटेड  मधील इतर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

Pune News : पीएमपीएल स्पीड ब्रेकरवर आदळल्याने मोडला प्रवासी महिलेचा मणका

 

रिता इंडिया फाउंडेशन च्या विश्वस्त संस्थापिका एच . सी . डॉ. सविता शेटीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यशाळेत भाग घेलेल्या अरुणा राठोड म्हणाल्या , या कार्यशाळेमुळे बऱ्याच गोष्टी (Hinjawadi News ) क्लिअर झाल्या. पाळी का येते ते आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात काय करायला हवे , हे आम्हाला समजले आम्ही नक्कीच जे सांगितले आहे ते करू.

कल्पना जाधव म्हणाल्या , आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण काम आणि काम याकडेच लक्ष देतो , आरोग्याकडे नाही. आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही काम चांगल्या प्रकारे करू शकतात . तेच आम्ही स्वतःसाठी नक्की करू दिवसातील 1 तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देऊ .

कंपनी तर्फे या सर्व महिलांचे स्वागत आणि सन्मान आणि केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.