Hinjawadi : गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी (Hinjwadi) हिंजवडी पोलिसांनी 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी शुक्रवारी (दि.8) साखरेवस्ती, हिंजवडी येथे करण्यात आली आहे.

हनमंत विलासराव बंडीवाळे (वय 34 रा.शिंदे वस्ती, मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अमर राणे यांनी फिर्याद दिली आहे,

Pune : प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदान केंद्राची माहिती देण्याची व्यवस्था करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोण्यात्याही परवानगी (Hinjawadi) शिवाय घरगुती वापराचा गॅस धोकादायक पद्धतीने रिलीफ पीनने गॅस काढून वाढीव दराने अवैधरित्या विकत होता. याप्रकरणी हंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 18 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.