Talegaon Dabhade News : गणपती मंदिरातून रोख रक्कम व चांदीचा मोदक चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ठाकरवस्ती येथील आकार (Talegaon Dabhade News)  फाऊंड्री कंपनीजवळ असणाऱ्या गणपती मंदिरात दान पेटीतील रक्कम व चांदिचा मोदक अशी 52 हजार रुपयांची चोरी झाली आहे. हि चोरी गुरुवारी (दि.9) ते शुक्रवार (दि.10) या कालावधीत झाली आहे.

संजय वासुदेव ओक (वय 60 रा. ठाकरवस्ती, तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Hinjawadi News : रिता इंडिया फाऊंडेशनतर्फे “महिलांचे आरोग्य आणि जागरूकता” विषयावरील कार्यशाळा संपन्न 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिर्यादी यांनी मंदिराचा लोखंडी दरावाजा बंद केलाहोता. चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून मंदिरात प्रवेश केला. चोरांनी मंदिराच्या दानपेटीतील 25 हजार रुपये, कपड्यांमध्ये असलेले 12 हजार 700 रुपये, 10 हजार रुपयांचा चांदीचा मोदक  व फिर्यादी यांचा 5 हजार रुपयांचा फोन असा एकूण 52 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील (Talegaon Dabhade News)  तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.