Alandi News : आळंदीत महिला दिनानिमित्त “नारी शक्तीचा” जागर

एमपीसी न्यूज – आळंदी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून (Alandi News) आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद शाळांच्या शिक्षिका,विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्या सहकार्यातून स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री पुरुष समानता, महिला सक्षमीकरण यासारख्या संवेदनशील विषयांवर भारुड, नाटक,एकांकिका, भाषण, समूहगीत,पथनाट्य द्वारे प्रबोधनात्मक संदेश देत नारी शक्ती चे महत्त्व अधोरेखित केले.

देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्याद्वारे आपला ठसा उमटवून सर्वांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या यशस्वी महिलांचे कार्य नगरपरिषद शाळांच्या विद्यार्थीनींनी हुबेहूब वेशभूषा साकारत यावेळी प्रभावीपणे मांडले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ओळखून बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने यावेळी उपस्थित महिलांना ब्युटी पार्लर, टेडी बिअर बनवणे सारख्या विविध मोफत कोर्सेस बाबत माहिती दिली गेली. जेणे करून याद्वारे महिलांमध्ये हे कौशल्य विकसित होवून त्या छोटे उद्योग सुरू करून आर्थिक दृष्ट्या सबल होवू शकतील.

Alandi News : केमिकलयुक्त सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडणाऱ्यांवर कारवाई करावी- इंद्रायणी सेवा फाऊंडेशन

आळंदी नगरपरिषदे मार्फत शहरातील महिला बचत गटांना स्वरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून यावेळी “इंदिरा स्वयंसहाय्यता बचत गटास” व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी 7 लक्ष रकमेचे कर्ज वाटप मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांच्या हस्ते चेक देऊन करण्यात आले.

महिला दिनानिमित्त आळंदी नगरपरिषद मार्फत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांनी यावेळी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणा ची गरज, स्त्रीभ्रूण हत्येच्या समस्या रुपी राक्षसास कारणीभूत मानसिकता बदलाची गरज आदी विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या सर्व महिला अधिकारी, नगरपरिषदेच्या चारही शाळांचे शिक्षिका,विद्यार्थी,विद्यार्थिनी तसेच शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकल्या शाळकरी मुलींनी आपल्या सुंदर अभिनयातून (Alandi News) डोळ्यात अंजन घालणारा दिलेला संदेश हा या नारी शक्तीच्या जागराचा प्रमुख आकर्षण बिंदू ठरला.याबाबत ची माहिती पालिकेतील आधिकारी सचिन गायकवाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.