Alandi News : केमिकलयुक्त सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडणाऱ्यांवर कारवाई करावी- इंद्रायणी सेवा फाऊंडेशन

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून  (Alandi News ) तसेच इंद्रायणी नदी  काठच्या गावातून,कारखान्यातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने सलग दोन दिवस आळंदी येथील नदीपात्र  केमिकलयुक्त सांड पाण्यामुळे फेसाळले आहे.

आळंदी येथील बंधाऱ्यातून दोन दिवस सतत पिवळसर केमिकल युक्त सांडपाणी पडत असल्याचे दिसून येत असून ते केमिकल युक्त सांडपाणी नदीपात्रात पडल्याने मोठ्या प्रमाणात फेस निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.त्या फेसाने तेथील नदीपात्र हिमनदी रूप धारण करत असल्याचा भास निर्माण होत आहे.

या वर्षाच्या जानेवारी महिन्यात सुध्दा  केमिकल युक्त सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात  इंद्रायणी नदीपात्र सलग दोन दिवस प्रदूषित झाले होते.याची दखल घेत जल निःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन, कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी चिखली परिसरात पाहणी केली होती.त्यानंतर इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.
महापालिकेची ती कारवाई होऊन सुद्धा काही कारखानदार सद्यस्थितीत इंद्रायणी नदीपात्रात रासायनिक युक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडत असल्याने दि.10 मार्च व दि.11 मार्च रोजी इंद्रायणी नदीपात्र रासायनिक सांडपाण्याने प्रदूषित होऊन फेसाळले होते.
 नदीपात्रातील रासायनिकयुक्त सांडपाण्यामुळे जलचर प्राण्यासह मानवी आरोग्य ही धोक्यात आले आहे.असे मत यावेळी इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथे व्यक्त केले.तसेच महाराष्ट्र नियंत्रण जलप्रदूषण मंडळाने मैलामिश्रित केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात (Alandi News ) सोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.