Nigdi News : भक्ती-शक्ती शिल्पाच्या सौंदर्यास बाधा ठरणारा डिजिटल बोर्ड तात्काळ हटवा – दिपक खैरनार

एमपीसी न्यूज – निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पाच्या मागे (Nigdi News ) असणाऱ्या हॉटेलच्या डिजिटल बोर्डामुळे शिल्पाच्या सौंदर्यास बाधा ठरत आहे. त्यामुळे हा डिजिटल बोर्ड तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी मधील भक्ती-शक्ती शिल्प म्हणजेच ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या स्मारकामागे असणाऱ्या तिरू हॉटेलचा ‘हॉटेल तिरू लॉज’ या नावाचा डिजिटल बोर्ड हा रात्रीच्या वेळेस स्मारकाच्या वरच्या बाजूस दिसत  असून या डिजिटल बोर्डामुळे शिल्पाच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे.

Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास

 

या तक्रारीची दखल घेऊन सदर डिजीटल बोर्ड हा तात्काळ हटविण्या संदर्भात (Nigdi News ) कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  खैरनार यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.