Alandi : आळंदीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आज (दि.14 रोजी) आळंदी शहरात मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. आळंदी नगरपरिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी पालिकेचे अधिकारी (Alandi) ,कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच आळंदी शहरात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

 

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाहीत – अजित गव्हाणे

आज ( दि.14)संध्याकाळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त ग्रामदैवत भैरवनाथ महाराज चौकापासून भव्य मिरवणुकीचे आयोजन सिद्धार्थ ग्रुपने केले होते.यावेळी भीम जन्मभूमी चित्ररथ व त्यावर असणारी आकर्षक विद्युत रोषणाई यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

 

चित्ररथावर असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, आळंदी पोलीस स्टेशन,पालिका  व आळंदी ग्रामस्थांच्या विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.तसेच या मिरवणुकीत भीमगीतांच्या तालावर अनेक जण नृत्य करत होते.तसेच या मिरवणुकीत फटाक्यांची  आतिषबाजी करण्यात आली. यावेळी हजारो भीमसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.