Today’s Horoscope 15 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 15 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 15.04.2024.

शुभाशुभ विचार – 12.00 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30  ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु.

चंद्र राशी – मिथुन 20.39 पर्यंत नंतर कर्क.

—————————–

मेष ( शुभ रंग- राखाडी)

महत्त्वाचे निर्णय घेताना आज तुमची द्विधा मनस्थिती होईल. महत्त्वाच्या कामासाठी झालेले प्रवास कार्य साधक ठरतील. गृहिणींचा गप्पांमध्ये आज जास्त वेळ जाईल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया)

आज व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस दुकानदारांची उधारी वसूल होईल खर्च कितीही वाढला तरी पैशाची कमतरता भासणार नाही वाणीत मात्र गोडवा असू द्या.

मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा अहंकार वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर साहेबांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.

कर्क ( शुभ रंग- पांढरा) 

आज तुमचा बराच वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवावी. काही जणांना आज तातडीचे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह ( शुभ रंग- मोरपिशी)

कार्यक्षेत्रातील तुमच्या समर्पणाचे चीज होईल. व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. आज झालेले काही अनपेक्षित लाभ तुमचा उत्साह वाढवतील.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी अधिकारांचा गैरवापर टाळावा. आज फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावे.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)

उद्योग व्यवसायात आलेल्या काही अडचणींना तुम्ही यशस्वीपणे तोंड द्याल. अनुभवी व्यक्तींचे सल्ले मात्र जरूर घ्या. आज कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.

वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम) 

कामगार वर्गाने आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. मोठ्या रकमेची ने आण करताना सतर्क रहा. वाहन चालवताना जपून.

धनु (शुभ रंग- भगवा)

नवीन नोकरीच्या शोधात असाल तर योग्य संधी चालून येतील. महत्त्वाच्या चर्चा सकारात्मकतेने पार पडतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. उत्साही दिवस.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरीत जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. उधारी उसनवारी टाळा.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही चैन व करमणूक या गोष्टींना प्राधान्य द्याल. नवोदित कलावंतांना प्रसिद्धी मिळेल. गृहिणी आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढतील. मुलांचे हट्ट पुरवतील.

मीन (शुभ रंग- चंदेरी)

आज कुठेच न जाता घरीच विश्रांती घेण्याचा तुमचा मूड असेल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने तुम्ही समाधानी असाल. वास्तु व वाहन खरेदीच्या कामांना गती येईल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.