Pune : वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या ( Pune )  आमिषाने एकाची 69   लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून   पोलिसांनी  सुनील नामदेव गडकर (वय 32, रा. गणेशयोग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) याच्यावर  गुन्हा दाखल केला आहे.

Today’s Horoscope 15 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

फिर्यादी यांच्या मुलास वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश हवा होता. वर्षभरापूर्वी त्यांची आरोपी सुनील गडकर याच्याशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. त्यावेळी गडकरने नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखविले होते.त्यानंतर गडकर याने त्यांना शास्त्री रस्त्यावरील भारती भवन परिसरात बोलावले.

त्यांच्याकडून कोरा धनादेश घेतला. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विविध प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागते, असे सांगून गडकरने त्यांच्याकडून वेळावेळी 69 लाख 70 हजार 742  रुपये उकळले. त्याने ऑनलाइन तसेच रोखीने पैसे स्विकारले. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्याने तक्रारदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर तपास करत ( Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.