Hinjawadi : बनावट चतुःसीमा दाखवून फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट चतुःसीमा दाखवून एकाने फसवणूक केली. ही घटना सन 2006 मध्ये भूमकर चौक, हिंजवडी (Hinjawadi) येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि.23) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीष गोविंदराव घाटगे (वय 48, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर कलाटे (रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Santosh Saundkar : नवीन कनेक्शनसाठी विलंब लावणा-या महावितरणच्या अधिका-यांवर कारवाई करा – संतोष सौंदणकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील सर्वे नंबर 19/3/3 येथील जागेच्या दस्तामध्ये आरोपीने चुकीची आणि बोगस चतुःसीमा दाखवली. त्यामध्ये फिर्यादी यांच्या जागेचा देखील उल्लेख केला. बनावट चतुःसीमा दाखवून आरोपीने फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.