Hinjawadi : हिंजवडी मेट्रो साईटवरून सामान चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- हिंजवडी येथे सुरू असलेल्या टाटा मेट्रो येथील साइटवरून दोघांनी 50 किलो वजनाचे साहित्य चोरले (Hinjawadi) होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Pune : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

ही चोरी रविवारी(दि.16) दुपारी घोटावडे फाटा येथील साइटवर झाली होती. याप्रकरणी श्रीकृष्ण विठ्ठल माळी (वय 31 रा.काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती .

त्यानुसार पोलिसांनी महेश संदीप कांबळे (वय 26) व  राहुल उल्हास पारखे (वय 43) ( दोघे राहणार माण. ) या दोघांना अटक केली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी साइटवर सुरक्षारक्षक सुपरवायझर म्हणून काम करतात. यावेळी आरोपींनी दुचाकीवरून येऊन साइटवरील दोन स्टीलचे व दोन सी टाईप रॉड असे 50 किलो वजनाचे साहित्य चोरून नेले होते.

पोलिसांनी दुचाकी क्रमांक वरुन आरोपींचा शोध लावत त्यांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Hinjawadi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.