Pimpri: युवक काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी हिराचंद जाधव 

एमपीसी न्यूज  – युवक काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी हिराचंद जाधव 177 मतांनी विजयी झाले आहेत. 

सर्वसामान्य तरुणांना राजकारणात समाविष्ट करुन घेण्यासाठी दर दोन वर्षांनी निवडणूक घेण्याची प्रक्रिया काँग्रेसमध्ये सुरु केली आहे. सन 2018 ते 2020 या दोन वर्षासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पिंपरी विधासनभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी हिराचंद जाधव 177 मतांनी निवडून आले आहेत. जाधव हे गेल्या चार वर्षांपासून युवक काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी काम करत होते.

पक्षाची ध्येय धोरणे आणि विचारसरणी तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे. युवकांच्या संघटन शक्तीतून काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बळकटी मिळवून देऊन नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे, जाधव यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.