Nigdi: रांगोळीतून ‘झाडे जगवा’ ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश

पाककृती स्पर्धेत कल्पना शेजुळ प्रथम

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये गणेशोत्सवानिमित्त महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध पाककृती स्पर्धांमध्ये कल्पना शेजुळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ ‘पर्यावरण वाचवा’ ‘साक्षरता महत्व’ अशा विविध विषयांवर रांगोळी काढली होती.

निगडी येथील मॉडर्न हायस्कुल येथे विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठी देखील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिला पालकांसाठी विविध पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक महिला पालकांनी पौष्टिक आणि रुचकर पदार्थ केले होते. या पाककलेत महिलांनी पौष्टिक बर्फी तर पालेभाज्यांचे विविध प्रकारचे पराठे केले होते. स्पर्धेचे परीक्षण शाळेच्या पर्यवेक्षिका सुमती पाटसकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलींबरोबर अनेक मुलांनी देखील पर्यावरण जागृती संदेश रांगोळीतून देण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ ‘पर्यावरण वाचवा’ ‘साक्षरता महत्व’ अशा विविध विषयांवर रांगोळी काढली होती. या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण शिक्षक कुसुम पाडळे आणि शिवाजी अंबिके यांनी केले. सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख सविता नाईकरे , सहाय्यक शिक्षिका आशा कुंजीर, वैशाली देसले यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य सतीश गवळी, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार तर कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी यशस्वी महिला स्पर्धक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

पाककृती स्पर्धेत – कल्पना शेजुळ, संगीता काकडे आणि अर्चना साळुंके यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात सृष्टी गोडसे, वैष्णवी कदम, तनीषा थोरात यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला तर आठवी ते दहावी गटातून कशीश खेडेकर प्रथम आणि वैष्णवी तावरे द्वितीय आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.