Maharashtra News : वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर नाचवले; त्र्यंबकेश्वर येथील प्रकार

एमपीसी न्यूज – नाशिक मधील त्र्यंबकेश्वर (Maharashtra News) तालुक्यात एका वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलींनी पालकांकडे तक्रार केली असता पालकांनी थेट पोलिसात धाव घेत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात संस्थेचे चालक आणि शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ‘आठवणी’चे पोस्टर प्रकाशित

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे एका खासगी संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतर्फे मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच या वसतिगृहात इयत्ता सातवी ते नववीच्या मुलींना प्रवेश देण्यात आला. शाळा सुरु होण्यापूर्वी मुलींना पारंपारिक नृत्य आणि संगणकाचे शिक्षण दिले जाणार असल्याचे सांगत पालकांकडून तीन हजार 500 रुपये घेण्यात आले.

शाळेच्या पाठीमागे असलेल्या टेकडीवर हॉटेल आहे. तिथे काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते नऊ वाजताच्या कालावधीत वसतिगृहातील मुलींना नाचण्यास सांगितले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मुलींनी नाचण्यासाठी नकार दिला असता संस्था चालकाच्या सांगण्यावरून शिक्षिकेने मुलींना छडीने मारले असल्याचेही पालकांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पालकांनी केलेले आरोप संबंधित शिक्षिकेने फेटाळून लावले. आम्ही मुलींना केवळ पारंपारिक नृत्य शिकवतो. शिक्षिका मुलींना नृत्य शिकवत असताना ते पर्यटक पाहत असतील. पण यासंदर्भात यापुढे काळजी घेतली जाईल, असेही संस्थेकडून सांगण्यात आले.

 

https://youtu.be/W8aahWUcgBE

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.