PimpleSaudagar : निवडणूक प्रचारात नागरिकांना दिलेल्या शब्दाला कर्तव्य म्हणून पूर्ण करण्यास मी सदैव कटिबद्ध :- शत्रुघ्न काटे

एमपीसी न्यूज -पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची कमतरता भासत होती. या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे सातत्याने प्रयत्न करत होते. आज या दोन्ही नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटला असून खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच पाण्याच्या टाकीच्या बांधणीचे काम सुरु करण्यात येणार आहे. सदर टाकी बांधून पूर्ण झाल्यानंतर पिंपळे सौदागर परिसरातील पाणीपुरवठयाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुनीता तापकीर, सविता खुळे, बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे,संदीप नखाते, शेखर कुटे, भानुदास काटे पाटील, प्रकाश झिंजुर्डे, अरुण चाबुकस्वार, संजय कुटे, चंदा भिसे, सुप्रिया पाटिल, सावंतताई, प्राजक्ताताई, संजय भिसे, मल्हारी कुटे, दत्तात्रय मुरकुटे, मनोहर काटे, सुभाष कुंजीर, सुनील वाघमारे, विशाल भिसे, पाणी पुरवठा अधिकारी रामदास तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी कुणाल आयकॉन रोडवरील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये पालिकेच्या अमृतयोजनेअंतर्गत पिण्याची पाण्याची टाकी उभारण्यात यावे, अशी सतत मागणी आपण केली होती. सन २०१२ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर प्रभागातील पाणीपुरवठ्याची बिकट परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावाही केला होता. आज त्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पिंपळे सौदागर, रहाटणीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

यावेळी निर्मला कुटे म्हणाल्या की, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागरचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसविणार होता. म्हणूनच गेल्या वर्षी मी स्थायी समितीत सदस्य असताना येथील पाण्याच्या टाकीच्या खर्चास अर्थसंकल्पात मंजूरी मिळवून घेतली होती. या पाण्याची टाकी ही २० लाख लिटरची असुन तिचे काम एप्रिल २०२० पर्यंत पुर्ण होणार आहे. पिंपळे सौदागर व रहाटणी मधील नागरीकांच्या पाठिंब्यामुळे हा विकास शक्य होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.