Alandi : आळंदीमध्ये सुरू आहे अवैधरित्या दारूविक्री

एमपीसी न्यूज : आळंदी येथील नदी पलीकडील हवेली भागात (Alandi) उघडपणे दारू विक्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन मुलगा ही दारू विकत घेतानाचे चित्र त्या भागात दिसून येत आहे.

त्यामुळे अवैध व्यवसाया विषयी शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

तसेच काल आणि आज एका वृत्त संस्थेने आळंदी शहरातील अवैध दारू व्यवसाय, मटका व देहविक्रय महिला संबंधी वृत्त प्रसारित केले होते. त्या नंतर हा व्हिडीओ प्रसारित झाल्याने आळंदीकरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

Khed : राजगुरूनगर येथे रक्तदान शिबिरामध्ये 226 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.