Pune : पुणे-हरंगुल दरम्यान विशेष रेल्वे सुरु

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेने पुणे ते हरंगुल दरम्यान(Pune) मंगळवार (दि. 10 ऑक्टोबर) पासून विशेष रेल्वे सुरु केली आहे. ही रेल्वे 31 डिसेंबर 2023 या कालावधीत दररोज धावणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा सुरु केली आहे.

पुणे- हरंगुल (01487) ही रेल्वे 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत दररोज सकाळी 6.10 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुपारी 12.50 वाजता हरंगुल स्थानकावर पोहोचेल.

Pimpri : जलतरण तलावांचे होणार ‘सुरक्षा ऑडिट’

हरंगुल-पुणे (01488) ही(Pune) रेल्वे 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत दररोज दुपारी 03.00 वाजता हरंगुल स्थानकावरून सुटेल. ही गाडी रात्री 09.00 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्शी आणि उस्मानाबाद स्थानकावर थांबेल. या गाडीला एक एसी प्रथम श्रेणी, एक एसी 2 टियर, चार एसी 3 टियर, पाच स्लीपर क्लास, तीन सामान्य द्वितीय श्रेणी, सामान सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारचा सहभाग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.