Chinchwad : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चिंचवडच्या तेजस शेळकेने पटकावले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – दुबई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा (Chinchwad) स्पर्धेत चिंचवडगावातील तेजस रेवणनाथ शेळके याने अथलेटिक्स क्रीडा प्रकारात चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस बोर्ड, दुबई येथील जनरल अथॉरिटी ऑफ स्पोर्ट्स (दुबई सरकार) द्वारे मान्यताप्राप्त क्रीडा संस्था, दुबईतील डॅन्यूब स्पोर्ट्स वर्ल्ड येथे 6 ते 9 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.संदीप भल्ला यांच्या नेतृत्वाखाली भारताचा संघही सहभागी झाला होता. ज्यात कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि ऍथलेटिक्सचे खेळाडू सहभागी झाले होते. या खेळांमध्ये 400 मीटर शर्यतीत चिंचवड गावातील धावपटू तेजस रेवणनाथ शेळके याने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले.

प्रशिक्षक ओमप्रकाश साह आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा व शारीरिक (Chinchwad) तंदुरुस्ती मंडळाचे संचालक डॉ. नितीश ओम प्रकाश यांच्या हस्ते तेजसला सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन देऊन सन्मानित करण्यात आले.


तेजस हा लहानपणापासूनच जिद्दी आहे. त्याची कष्ट करण्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे. याच जोरावर त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही त्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहील, याची खात्री आहे.

रेवणनाथ शेळके, तेजसचे वडील


तेजसचे बारावी पर्यत शिक्षण चिंचवडगावातील श्री.फत्तेचंद जैन विद्यालय येथे झाले असून, सध्या तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागातून पदवीचे शिक्षण घेत आहे.

तसेच तो शिक्रापूर येथील गरुडझेप अकॅडमीत अथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. नुकत्याच झालेल्या पानिपत येथील स्पर्धेत तेजसने उत्कृष्ट कामगिरी करीत कांस्य पदक पटकावले होते.

याच माध्यमातून त्याची दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याने आपली निवड सार्थ ठरवत चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.