Shirgaon : शिरगावात जागेवरून 60 जणांचा राडा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिरगाव (Shirgaon) येथे जागेवरून मोठा गोंधळ झाला. सुमारे 60 जणांनी एका व्यक्तीच्या जागेत येऊन ती जागा आपली असल्याचे म्हणत राडा केला. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.

Chinchwad : शहर पोलीस दलात दोन नवीन अधिकारी दाखल

लिंबाजी रामभाऊ गायकवाड (वय 54, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडकी येथील 32 वर्षीय महिला आणि तिच्या 50 ते 60 साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील फिर्यादी यांच्या जमीन गट नंबर 197 मध्ये आरोपी महिला तिच्या 50 ते 60 साथीदारांसोबत आली. तिने ती जागा आपली असल्याचे सांगत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगावर येऊन शिवीगाळ, दमदाटी केली. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.