Pune News : ‘इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स’ प्रदर्शनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : ‘इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स’या विषयावर प्रदर्शन,प्रात्यक्षिके आणि चर्चासत्राचे उद्घाटन आज शुक्रवार,९ डिसेंबर रोजी ओ हॉटेल,कोरेगाव पार्क येथे करण्यात आले .

पॉवर टेक्निक्स इन्फोसोल्युशन्स प्रा.लि.आणि मंत्र सॉफ़्टेक इंडिया प्रा.लि.यांच्या वतीने आयोजीत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरु होते. पॉवर टेक्निक्स इन्फोसोल्युशन्स प्रा.लि.च्या वतीने कैलास बाहेती यांनी स्वागत केले.

टचलेस फेस रेकग्निशन, बायोमेट्रिक फेस रेकग्निशन, बायोमेट्रिक वर्क फोर्स मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी, सर्व्हेलन्स बाबतीतील यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती देण्यात आली आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

महेश कामठे( संचालक, आर.एस. कामठे इन्फ्रास्ट्रक्चर), सुशांत ढमढेरे(संचालक, पुणे अर्बन को ऑपरेटिव्ह बँक), चेतना बिडवे (संस्थापक,संकल्प एज्युकेशन सोसायटी), कैलास बाहेती,आदेश सिकची,अंजली वाघ आदी मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्सच्या दृष्टीने भरविले गेलेले हे प्रदर्शन अतिशय माहितीपूर्ण असून माझ्या व्यवसायाला यातील उपकरणांचा नक्की कसा उपयोग करता येईल याचा मी प्रयत्न करेन, असे मत महेश कामठे यांनी व्यक्त केले.

Pune News: पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण

“मी बॅंकींग क्षेत्रात काम करत असल्याने या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेली उत्पादने माझ्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाची आहेत, जसं लॉकर, सुरक्षा व्यवस्था , स्टाफ व्यवस्थापन इत्यादी साठीही ही उपकरणे उपयुक्त आहे” असे मत सुशांत ढमढेरे यांनी व्यक्त केले.

“फक्त कॅमेरे म्हणजे सुरक्षा व्यवस्था नव्हे, हे या प्रदर्शनातून समजले, पुढील काळात सुरक्षेच्या दृष्टीने काय अडचणी येवू शकतात आणि त्यावर कशी मात करता येऊ शकते, या दृष्टीने या प्रदर्शनात अनेक उपयुक्त उपकरणे पाहायला मिळाली, ही उपकरणे अगदी सामान्य माणसापासून ते अगदी सरकारी यंत्रणेपर्यंत सर्वांना उपयोगी आहेत” असे मत बिडवे यांनी व्यक्त केले.

“मानवी सुरक्षा व्यवस्था ही अतिशय महत्त्वाची असून लाईफस्टाईल सुधारण्यासाठी आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुरक्षित जीवन शैली आपल्याला जगता येईल, त्या दृष्टीने अनेक अत्याधुनिक उपकरणांचे हे प्रदर्शन एका जागी भरविले, जेणेकरून प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, आय.टी. मॅनेजर, प्रोफेशनल, बॅंकर, इत्यादी लोकांना आम्ही या प्रदर्शनासाठी खास निमंत्रित केले आहे, जेणेकरून त्यांना एका जागी या उपकरणांची उपयुक्तता प्रात्यक्षिकांमधून समजू शकेल, अशी माहिती कैलास बाहेती यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पवार आणि सुनिता अमराळे यांनी केले, तर प्रास्ताविक आदेश सिकची यांनी केले. अंजली वाघ, आदेश सिकची, भरत गुरव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.