India : सिद्धू मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी घेत गोल्डी ब्रारची सलमान खानला धमकी

एमपीसी न्यूज – सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची( India ) धमकी आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून धमकी मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आता सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागे हात असल्याचा दावा करणाऱ्या गोल्डी ब्रारने सलमान खानला जीवे मारणार असे म्हटले आहे.

इंडिया टुडे यांना दिलेल्या मुलाखतीत गोल्डी ब्रार म्हणाला की त्यांची टोळी सलमानला “नक्कीच” मारेल. “आम्ही त्याला ठार मारू, आम्ही नक्कीच मारू. भाई साहेब (लॉरेन्स) यांनी सांगितले होते की मी माफी मागणार नाही. बाबा त्याला तेव्हाच दया दाखवतील जेव्हा त्यांना सलमानला दया द्यायची असेल,” असे गोल्डी ब्रार म्हणाला व मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई याचा संदर्भ देखील दिला.

Kasarwadi : गाडी नीट चालव म्हणत तरुणाला मारहाण

गोल्डी ब्रार पुढे म्हणाले, “आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, हे फक्त सलमान खानबद्दल नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही आमच्या सर्व शत्रूंविरुद्ध आमचे प्रयत्न चालू ठेवू. सलमान खान आमचे लक्ष्य आहे, यात शंका नाही. आम्ही प्रयत्न करत राहू आणि आम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला कळेलच.”

गोल्डी ब्रार म्हणाला, सलमान खानने बिश्नोई समाजाचा अपमान केला आहे. काळवीटाची शिकार केली. ज्याप्रमाणे हिंदू गीतेला पवित्र मानतात, शीख गुरु ग्रंथाला पवित्र मानतात, त्याचप्रमाणे बिष्णोई समाज काळवीट याना पवित्र मानतो.

गोल्डी ब्रारच्या असल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे मे महिन्यात, कॅनडाच्या सरकारने गोल्डी ब्रार ज्याचे खरे नाव सतींदर सिंग ब्रार आहे याला देशभरात वॉन्टेड घोषित केले ( India ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.