Wakad : इंदोर ते वाकड प्रवासादरम्यान लाखो रुपयांचे दागिने आणि पैसे चोरीला

एमपीसी न्यूज : इंदोर ते वाकड (Wakad) बसने प्रवास करताना 2.95 लाख रूपयांची सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेले असल्याची घटना घडली आहे.

याबाबत पीडित महिलेने चौकी येथे तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या इंदोर येथून 18 ऑक्टोबरला रात्री त्यांच्या मुलांना रावेत येथे भेटण्यासाठी बसने निघाल्या होत्या. त्या 19 ऑक्टोबरला सकाळी वाकड येथे पोहोचल्या. या दरम्यान प्रवास करतेवेळी कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीचा इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी 2.95 लाख रूपयांची सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.