Wakad : पादचारी व्यक्तीला अडवून मारहाण करत लुटणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – पादचारी व्यक्तीला अडवून मारहाण करत (Wakad) करत लुटणाऱ्या एका तरुणाला अटक करत त्यच्या तीन साथीदारांना गुन्हे शाखा युनिट चार आणि दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले. 23 जुलै रोजी डांगे चौकाजवळ या चौघांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांसोबत मिळून लुटले होते.

अजय शंकर शर्मा (वय 19, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अजयच्या अन्य तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे साथीदार सौरभ संतोष आरगळे (रा. रुपीनगर, निगडी), मुकेश गुप्ता (रा. बिजलीनगर, चिंचवड) हे अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी एक मजूर डांगे चौकातून पायी चालत जात असताना त्याला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटले. माजुराकडील दहा हजार रुपये चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाच्या (Wakad) तपासासाठी गुन्हे शाखा युनिट चार आणि दरोडा विरोधी पथक यांची दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही पथकांनी डांगे चौक परिसरातील सुमारे 70 सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरटे कुठे गेले याचा माग काढला आणि चौघांना ताब्यात घेतले.

Bhosri : एटीएमची अदलाबदल करून दोघांची फसवणूक

चौघांकडून चोरी केलेले तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पोलिसांना तपासासाठी उपयोग झाला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतिष माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक फौजदार दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, आबासाहेब किरनाळे, पोलीस अंमलदार प्रविण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे, दरोडा विरोधी पथकाचे सहायक फौजदार महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, समिर रासकर, आबा कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, कांबळे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहायक निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.