Bhosri : टास्कच्या बहाण्याने सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फसव्या वेब पेजच्या माध्यमातून टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची चार लाख 24 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 19 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घडला.

Wakad : पादचारी व्यक्तीला अडवून मारहाण करत लुटणाऱ्यास अटक

याप्रकरणी 37  वर्षीय व्यक्तीने भोसरी (Bhosri) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 855383840878 आणि टेलिग्राम आयडी धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्सअप आणि टेलिग्राम द्वारे आरोपींनी फिर्यादी यांना फसव्या वेब पेजची लिंक पाठवली. त्यावर टास्क पूर्ण केल्यास तात्काळ आकर्षक पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले होते.

 

आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी चार लाख 24 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी (Bhosri ) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.