Maharashtra ISIS Module : एनआयएची मोठी कारवाई; कोंढव्यातून इसिसमध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरला अटक

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय तपास संस्थेने (Maharashtra ISIS Module) आज इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन देण्याऱ्या आणखी एका व्यक्तीला एनआयएने अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

कोंढवा येथे छापे टाकून एनआयएने डॉ. अदनानली सरकार (वय 43) याला अटक केली आहे. एनआयएने अदनानलीच्या कोंढवा येथील घराच्या झडती घेतली असून या दरम्यान त्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS संबंधित अनेक दस्तऐवज यांसारखी अनेक अपराधी सामग्री जप्त केली.

या सामग्रीने आरोपीची ISIS सोबतची निष्ठा तसेच तरुणांना प्रेरित करून त्यांना संघटनेच्या हिंसक कार्यक्रमात भरती करण्याची भूमिका उघड केली आहे.

Bhosri : टास्कच्या बहाण्याने सव्वाचार लाखांची फसवणूक

आरोपींनी इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS)/ Daish/Islamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या ISIS च्या दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता.

एनआयएच्या तपासानुसार, अदनानली देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. तो  आयएसआयएसच्या कटाचा भाग म्हणून भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारत होता.

या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. ज्याची NIA ने 28 जून 2023 रोजी नोंद (Maharashtra ISIS Module) केली होती. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती.

मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ISIS च्या कटाची संपूर्ण रूपरेषा उलगडण्यासाठी एजन्सी महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.