Maval : इंदोरी-कुंडमळा रस्त्याची दुरुस्ती करा – भगवान शेवकर

एमपीसी न्यूज – इंदोरी-कुंडमळा (Maval) या मार्गावरून सांगुर्डी, इंदोरी, जांबवडे, कुंडमळा, कान्हेवाडी या पाच गावातील नागरिकांची वाहतूक होत आहे. त्यात या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.

Maharashtra ISIS Module : एनआयएची मोठी कारवाई; कोंढव्यातून आणखी एक दहशतवादी अटक

शालेय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे गंभीर अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भगवान शेवकर यांनी केली आहे.

 

त्याचबरोबर प्रगती हायस्कूल, सरस्वती शाळाआणि चैतन्य इंटरनॅशनल स्कूल अशा तीन शाळा या रस्त्यावरती येत आहेत. मुलांचा प्रवास या रोडवरती होत असताना काही अनर्थ तर घडणार नाही ना अशी भीती मनामध्ये येते  आणि असा अनर्थ झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का अशी  शंका मनामध्ये येते.

 

प्रशासन अशी घटना घडावी म्हणून वाट पाहत आहे का? कृपया येणाऱ्या भावी पिढीचा विचार करता आणि ग्रामस्थांचा विचार करता या रोडवरची  वाहतुकीत चांगल्या प्रकारची सुधारणा होणे गरजेचे आहे. या कामी संबंधित विभागाने लक्ष घालावे.

 

यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम होईल असा प्रयत्न करावा अशी विनंतीही शेवकर यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.