Khadakwasla Dam : पुणेकरांसाठी खूशखबर; खडकवासला धरण भरले 100 टक्के!

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या (Khadakwasla Dam) वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70.06 टक्के, तर 20.42 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे. तर, चार धरणापैकी खडकवासला धरण हे 100 टक्के भरले आहे.

Maharashtra ISIS Module : एनआयएची मोठी कारवाई; कोंढव्यातून आणखी एक दहशतवादी अटक

तर गतवर्षी आजच्या तारखेला 73.18 टक्के, तर 21.33 टीएमसी इतका पाणीसाठा (Khadakwasla Dam) जमा होता.

धरण              आजचा पाऊस    टीएमसी        टक्के
खडकवासला     3 मिमी               1.97        100
पानशेत              17 मिमी              7.93       74.49
वरसगाव            17 मिमी             8.65        67.46
टेमघर                30 मिमी            1.87         50.39

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.