Vadgaon : वडगावात लागणार 40 सौर हायमास्ट दिवे

एमपीसी न्यूज –  वडगाव  (Vadgaon) शहरातील विविध भागांत सुमारे 40 सौर हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाला  गुरुवारी(दि 27) सुरुवात झाली.  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण योजनेअंतर्गत हे काम केले जात असून यासाठी सुमारे एक कोटी 63 लाख रुपये खर्च येणार आहे.

Khadakwasla Dam : पुणेकरांसाठी खुशखबर; खडकवासला धरण भरले 100 टक्के!

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तर वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्यातून हे काम केले जात आहे.

 

यावेळी प्रत्यक्षात कामे सुरू असताना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी विविध भागांत अधिकारी व कर्मचारी यांना पाहणी करताना अत्यावश्यक सूचना केल्या.

 

या आठवड्यात सौर उर्जेचे सर्व दिवे उभारून पूर्ण होणार आहेत. नगरपंचायत वर येणारा लाईट बिल चा ताण या सौर ऊर्जेच्या दिव्यांमुळे कमी होण्यास हातभार लागणार आहे. पुढील टप्प्यात अजून काही सौर दिवे बसविण्यात येतील हा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.