Vadgaon : मावळ फेस्टीवलसाठी मंच पूजन संपन्न; 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार मावळ फेस्टिवल

एमपीसी न्यूज – कला, क्रीडा आणि संस्कृतीचा ( Vadgaon ) खजिना असलेल्या मावळ फेस्टीवलसाठी मंच पूजन ग्रामदैवत श्री पोटोबा जोगेश्वरी मंदिर प्रांगणात संपन्न झाले. मावळ फेस्टीवल संस्थेचे यंदा 16वे वर्ष आहे. 26 ते 28 जानेवारी या कालावधीत ग्रामदैवत श्री पोटोबा जोगेश्वरी मंदिर प्रांगणात मावळ फेस्टीवल दररोज सायंकाळी संपन्न होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वडगाव मावळ आणि परिसरातील नागरिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य अविनाश बवरे,मा.जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले,मा. नगरसेवक सुनील ढोरे यांच्या हस्ते आणि उद्योजक सोमनाथ ढोरे,ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव भिलारे,उद्योजक खंडूशेठ भिलारे आणि मावळ फेस्टीवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, अध्यक्ष सुरेश जांभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंच पूजन संपन्न झाले.
उपाध्यक्ष विनायक भेगडे,सचिव विवेक धर्माधिकारी, खजिनदार महेंद्र म्हाळसकर,सह.सचिव ॲड.पवन भंडारी,सह.खजिनदार सागर जाधव,संचालक नामदेवराव ढोरे,बाळासाहेब भालेकर,नितीन कुडे,अरुण वाघमारे, शैलेन्द्र ढोरे,शामराव ढोरे,जितेंद्र कुडे, रवींद्र काकडे,किरण म्हाळसकर, शंकरराव भोंडवे,भूषण मुथा आदी मान्यवर आणि ग्रामस्थ ( Vadgaon ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.