NIA DG Sadanand Date : राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदी मराठमोळे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – सन 1990 महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते (NIA DG Sadanand Date)यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदावर नियुक्ती केली आहे. आयपीएस दाते यांनी आजवर आयबी, सीआरपीएफ, एटीएस मध्ये त्यांनी महत्वाच्या पदांवर काम केले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत होते.
मुळचे पुण्याचे असलेले सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून एम कॉम(NIA DG Sadanand Date) पर्यंतचे शिक्षण घेतले. पोलीस सेवेत आल्यानंतर पुढे त्यांनी आर्थिक गुन्हे विषयात पीएचडी मिळवली. शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये ते लहानपणी पोलिसांच्या घरात वर्तमानपत्रे वाटण्याचे काम करत होते. तिथून त्यांची वर्दीत काम करण्याची इच्छा झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना युपीएससी बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी प्रयत्नपूर्वक युपीएससी परीक्षेत यश मिळवले.
युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांच्याकडे आयएएस, आयपीएस, आयए आणि आयएस असे तीन पर्याय होते. त्यातील आयपीएस हा पर्याय त्यांनी निवडला. पहिली पोस्टिंग त्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे झाली. त्यानंतर त्यांनी भंडारा, अमरावती, मुंबई येथे काम केले.

SBI Debit Card : एसबीआय बँकेने डेबिट कार्ड देखभाल शुल्कात केली वाढ; खातेदारांच्या खिशाला लागणार कात्री

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे दाते हे पहिले पोलीस आयुक्त बनले. मुंबई पोलीस दलात गुन्हे शाखा प्रमुख, कायदा आणि सुव्यवस्थेचे सह आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना त्यांनी केली.
सन 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यात सदानंद दाते यांनी शौर्य दाखवले. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले. महाराष्ट्र पोलीस दलासह त्यांनी सीबीआय, सीआरपीएफ मध्ये देखील महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी, इंडियन पॉप्युलर फ्रंट यांसारख्या बंदी घातलेल्या संघटना आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारतासह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांमधून तपास करणाऱ्या एनआयएच्या प्रमुख पदाची जबाबदारी आता मराठमोळे आयपीएस अधिकारी सदानंद वसंत दाते यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.