Petrol Diesel Price Drop : पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची ट्वीट करत माहिती

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल (Petrol Diesel Price Drop)आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात कमी झालेल्या किंमती लागू होणार आहेत . केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ”पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, आपल्या कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.”

 

Electoral Bond Data : निवडणूक आयोगाने जाहीर केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा; कोणत्या पक्षाला मिळाली देणगी?

हरदीप सिंह पुरी यांनी पुढे लिहिले की, “जग कठीण काळातून जात असताना विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती 50-72 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये पेट्रोल मिळणेही बंद झाले होते.तेलाचे सर्वात मोठे संकट असूनही 1973 पासून पन्नास वर्षांत मोदींचे कुटुंब त्यांच्या दूरदर्शी आणि अंतर्ज्ञानी नेतृत्वामुळे प्रभावित झाले नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत 4.65 टक्क्यांनी कमी झाले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी गेल्या 7 दिवसात दोन निर्णय घेतले आहे. याआधी 8 मार्च महिला दिनानिमित्त एलपीजी गॅस 100 रुपयांनी स्वस्त केला होता आणि आज आचारसंहिता लागण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल प्रतीलिटर 2 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या नवीन किंमत शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात लागू होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.