Today’s Horoscope 15 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 March 2024
आजचा दिवस – शुक्रवार.
तारीख – 15.03.2024.
शुभाशुभ विचार – 16 नंतर चांगला.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 13.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – कृतिका 16.08 पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष- ( शुभ रंग- चंदेरी)
व्यवसायातून आवक मुबलक असेल. फिरते विक्रेते आज चांगली कमाई करतील. महत्त्वाच्या चर्चेत तुमचेच म्हणणे इतरांवर लादू शकाल. आज प्रवास त्रासदायक होतील.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी)
आज गरजूंना यथाशक्ती मदत करण्याकडे तुमचा कल असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. आज भावनेच्या भरात घेतलेले निर्णय मात्र चुकू शकतात.

मिथुन (शुभ रंग -निळा)
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.

कर्क ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. खिशात पैसा खेळता असल्याने जीवलग मित्र आज तुमचा शब्द झेलतील.

सिंह ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांना वेळ देणे तुम्हाला अवघडच जाईल.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)
दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगायला हरकत नाही. एखाद्या धार्मिक कार्यात तुम्ही सहभाग घ्याल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

Pune : जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 10 कोटी 68 लाखांचा बाह्यवळण रस्तामंजूर

तूळ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित तुमच्या मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. सावध राहा.

वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा) Today’s Horoscope 15 March 2024
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ असेल.

धनु (शुभरंग- स्ट्रॉबेरी)
कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

मकर(शुभ रंग- मोतिया)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

कुंभ ( शुभरंग- डाळिंबी)
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावेसे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

मीन (शुभ रंग- भगवा)
आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. मुले आज खेळात जास्त रमतील. कौटुंबिक सदस्यात मतभेद असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.