PCMC : महापालिका अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामाला;पालिकेतील नागरिकांची वर्दळ कमी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर (PCMC)महापालिकेतील विविध कामासाठी येणा-या नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. मावळ व शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पिंपरी, चिंचवड आणि भोसरीचे कामकाज अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहे.  

शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदार संघ(PCMC) आहेत. निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांची नेमणूक केली आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत.

Pimpri : नदीपात्रात भराव टाकणा-यांवर कारवाई, एक लाखाचा दंड वसूल

 

निवडणूक विषयक कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक, भोजन, कार्यालय आदी व्यवस्था करणे. जनजागृती करणे, कारवाई करणे आदी कामासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामासाठी नेमणूका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. महापालिकेत तुरळक गर्दी दिसत आहे. लोकसभा आचारसंहितेचा कालावधी अडीच महिन्यांपेक्षा अधिक आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नेमले जातात. एकाच अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन-दोन मतदार संघांत नेमण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने असे प्रकार घडत आहेत. मात्र, एका ठिकाणची नियुक्ती रद्द करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. तर, ठरावीक मतदार संघासाठी अनेक कर्मचारी नेमण्यात आल्याच्या तक्रारी अधिकारी, कर्मचारी करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.