Pimpri : नदीपात्रात भराव टाकणा-यांवर कारवाई, एक लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज  – शहरातून वाहणा-या पवना नदी पात्रात राडारोडा टाकून भराव (Pimpri )टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नऊ वाहने पकडून 1 लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेच्या विविध भागांतून दररोज ट्रॅक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो 407, आर.एम.सी प्लॅन्टच्या (Pimpri )मिक्सर गाड्या अशी वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकताना मिळून आली.

यामुळे हवा प्रदूषण होत असल्याबाबतच्या तक्रारी पर्यावरण विभागास प्राप्त झाली होती. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहून करुन सापळा रचून वाहनचालकांवर कारवाई केली. नदी पात्रात भराव करणारे शिवा राठोड, उमेश बारणे, वेदांत देसाई, आर.डी.वाघेले, तेजस उक्के, प्रकाश चौधरी,कांतीलाल पवार यांची 9 वाहने पकडली. त्यांच्याकडकून 1 लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, अभियंता स्वप्निल पाटील,   पुष्पराज भागवत यांनी ही कारवाई केली.

 

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीचा दुसरा जागतिक विक्रम

यापुढे नदी, नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास  आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.