Maharashtra: हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या वृंदा सुतार हिस राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक

एमपीसी न्यूज – एम.ऐ.स्टेडियम, जम्मू येथे 18 वी ऐरोबिक्स जिम्नॅस्टिक (Maharashtra)ची राष्ट्रीय स्पर्धेचे 22 ते 24 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

यात हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या वृंदा सुतार हिने खुल्या गटात वैयक्तिक महिला (Maharashtra)प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धेत तिने 15:49 गुणांनी रजत पदक पटकावले आहे.राष्ट्रीय स्पर्धेतील हे तिचे पहिलेच पदक आहे.

इतर 9 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.17 वर्षाखालील गटात परीजा (तिसरी), 14 वर्षाखालील गटात अनवी (तिसरी) व 11 वर्षाखालील गटात राही( पाचवा क्रमांक) या आपल्याला वयोगटात वैयक्तिक महिला प्रकारात सादरीकरण केले.तर 14 वर्षांखालील गटात तिहेरी प्रकारात सानवी, धानी,ईश्वरी(तिसरा क्रमांक) व 11 वर्षांखालील गटात सिद्दी, गितीका व राहीने (चौथा क्रमांक) सादरीकरण केले.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीचा दुसरा जागतिक विक्रम

सदर स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्राकडून हर्षद कुलकर्णी यांची निवड झाली होती. खेळाडूंचे संपूर्ण नियोजन प्रशिक्षक.अलका तापकीर यांनी बघितले. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अदित्य जोशी,सचिव मकरंद जोशी,संघाचे प्रशिक्षक हर्षल मोगरे,ऋग्वेद जोशी,पंच विवेक देशपांडे, ईशा महाजन,निलेश जोशी,पिंपरी चिंचवड संघटना अध्यक्ष संजय मंगोडेकर,सचिव संजय शेलार,मार्गदर्शक मनोज काळे,दिपक सुनारीया,माजी नगरसेवक विनोद तापकीर, नवीन तापकीर व समस्त अकादमी पालकांनी संपूर्ण संघाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.