SBI Debit Card : एसबीआय बँकेने डेबिट कार्ड देखभाल शुल्कात केली वाढ; खातेदारांच्या खिशाला लागणार कात्री

एमपीसी न्यूज – एसबीआय बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक देखभाल(SBI Debit Card )शुल्कात पूर्वीपेक्षा 75 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या कोट्यावधी खातेदारांना आर्थिक फटका बसणार आहे.

क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस, गोल्ड, कॉम्बो, माय कार्ड, (SBI Debit Card )प्लॅटिनम डेबिट कार्डच्या वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्यात आली आहे. एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेचे कोट्यावधी खातेदार आहेत. त्यामुळे बँकेच्या या धोरणाचा कोट्यावधी खातेदारांना आर्थिक फटका बसणार आहे.

क्लासिक, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस, डेबिट कार्डसाठी जीएसटीसह 125 रुपये वार्षिक शुल्क आकारले जात आहे. मात्र पुढील आर्थिक वर्षांपासून त्यात 75 रुपयांची वाढ होऊन वार्षिक 200 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Maharashtra: हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या वृंदा सुतार हिस राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक

युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्ड या इमेज कार्डसाठी आता जीएसटीसह 175 रुपये द्यावे लागतात. त्यात 75 रुपये वाढ होऊन 1 एप्रिल पासून 250 रुपये द्यावे लागणार आहेत.

प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 250 रुपये द्यावे लागत होते. आता जीएसटीसह 325 रुपये द्यावे लागणार आहेत.

प्राईड किंवा प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी 350 रुपये देखभाल शुल्क द्यावे लागत होते. ते आता 425 रुपये होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.