Bhosri : टास्कच्या बहाण्याने एका मेडिकल व्यवसायिकाची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- टास्क कम्प्लीट केल्यानंतर आकर्षक पैसे मिळतील. असे आमिष दाखवून एका मेडिकल स्टोअर व्यावसायिकाला आठ लाख 96 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे हा प्रकार चार मार्च ते 21 मार्च 2023 या काळात ऑनलाईन पद्धतीने घडला.

Bhosri : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे गळफास घेत आत्महत्या

यावरून भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे. यावरून टेलिग्राम युजर आयडी @Adityabhavana,@shsh164 व @kscircus वापरकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, टेलिग्राम वरून फिर्यादी यांच्या शी संपर्क साधून फसव्या वेब पेज च्या माध्यमातून टास्क दिले. कंप्लीट केल्यानंतर आकर्षक बक्षिस मिळेल असे सांगण्यात आले. त्यावरून फिर्यादी यांनी पैसे गुंतवले मात्र कोणताही परतावा न देता 8 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केली. यावरून भोसरी (Bhosri) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.