Bhosari : सराईत वाहन चोरट्यास अटक; सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला(Bhosari) अटक केली. त्याच्याकडून सात दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे भोसरी, पिंपरी आणि शिरूर पोलीस ठाण्यातील सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकिस आले आहेत.

मोहम्मद राशीद शाहिद शेख (वय 20, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे (Bhosari)अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Alandi:श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांचे कडून ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ ची परिवारातील सदस्यांचा सन्मान

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात होणाऱ्या वाहन चोरी प्रकरणी कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी भोसरी पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार भोसरी पोलिसांनी वाहन चोरी होणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरून आरोपीची ओळख पटवत पीएमटी चौक भोसरी येथून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करत त्याने चोरी केलेल्या दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, शिरूर आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. एमएच 12/जीजे 8135 या दुचाकीबाबत पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, सहाय्यक पोलीस फौजदार बोयणे, चव्हाण, पोलीस अंमलदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, रमेश भोसले, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.